स्व. हनुमंतरावजी ठाकरे यांच्या प्रथमस्मृती स्मरणार्थ ठाकरे व बारहाते परिवार यांच्या तर्फे आज सोनेगाव येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची भेट देऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांचे प्रथम पुण्यस्मरण साजरे करण्यात आले आहे,शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी विशेष पाहुणे. API मोहारे मॅडम सोनेगाव पोलीस स्टेशन,प्रमुख उपस्थिती श्रीमती कुमोदींनी ताई जांभुळकर, तसेच स्व. हनुमंतरावजी ठाकरे यांचे चिरंजीव श्री रवींद्र हनुमंत ठाकरे सर,अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग, तसेच कन्या डॉ. रेखा विनय बारहाते (ठाकरे) व सौ. रत्ना विजय भांडे (ठाकरे) व सुन सौ. जोसना रवींद्र ठाकरे, यांची उपस्थिती होती. स्व. हनुमंतरावजी ठाकरे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिवस ठाकरे व बारहाते परिवारातर्फे साजरा करण्यात आला असून सोनेगाव येथील २००विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप या निमित्ताने करण्यात आले आहे, विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावं आणि आपली स्वप्ने पूर्ण करावी असे मार्गदर्शन श्री. रवींद्र ठाकरे यांनी केले, APL मोहारे यांनी मुलींना सायबर सुरक्षा पासून मुलींनी आपले सौरक्षण कसे करावे व त्याबाबत कशी काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले असून, रेखा बारहाते यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत मदत देण्याचे अस्वासन विद्यार्थ्यांना दिले.