महिला समुपदेशन केंद्र




नागपूर महानगरपालिका, समाज कल्याण विभाग, बापूजी बहुजन समाज कल्याण बहुउद्देशीय संस्था नागपूर द्वारा संचालित स्व. अनुसायाबाई काळे स्मृती महिला समुपदेशन केंद्र महिला व बालकांवरील होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी कौटुंबिक वाद समस्या निवरणाकरिता महानगरपालिका लक्ष्मीनगर झोन क्र.१ येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू आहे.
•संस्थेचे उद्देश
•समुपदेशन केंद्राद्वारे महिलांना खालीलप्रमाणे सुविधांचा लाभ दिला जातो.
१ ) शोषित पीडित स्त्रिया व बालकांना प्रतिकारात्मक किंवा पुनर्वसनात्मक सहाय्य देणे व मार्गदर्शन करणे.
२ ) वैवाहिक समायोजन बाबत समस्या असलेल्या जोडप्यांन करिता तसेच इतर कौटुंबिक समश्यांकरिता मार्गदर्शन व सल्ला देणे.
३) स्त्रिया व बालकांविषयी प्रचलित कायद्यांबाबत लोकांना अवगत व जागृत करणे.
४) कुटुंबांना विघटित होण्यापासून वाचवणे व विघटित कुटुंबांना कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शनाद्वारे पुनर्वसनांस प्रवृत्त करणे.

आम्ही पुढील समस्या सोडविण्यास मदत करतो


• कौटुंबिक तंटे / संघर्ष
• वैवाहिक असामंजस्य
• हुंडा बळी / घरगुती हिंसाचार
• स्त्रिया व मुलां विषयी कायद्याच्या अंमलबजावणी संबंधीच्या समस्या.
• माता पिता आणि मुले यांच्यातील असामंजस्य/ असामायोजन.
• विधवा आणि घटस्फोटीत स्त्रियांना व त्यांच्या मुलांना मिळणारे अधिकार व वाटा याबाबत सहाय्य.
• बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध.
• स्त्रीधन मिळण्याबाबत मार्गदर्शन.
• विधितज्ज्ञ यांचे कडून मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन दिले जाते.
• आपल्या किंवा आपल्या माहितीतील व्यक्तींना वरील पैकी कुठलीही समस्या भेडसावत असल्यास अमाच्याशी संपर्क साधा.
• तुमच्या जीवनातील समस्या सोडवून नवचैतन्य निर्माण करणे हेच एकमेव ध्येय आहे.
• फोन द्वारे २४ तास महिलांसाठी मार्गदर्शन सेवा उपलब्ध आहे.
महिलांना स्वाभिमानाने जगता यावे या करिता संस्था व महानगरपालिका लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या भागातील महिलांना मोफत मार्गदन करून त्यांचे जीवनमान सुसह्य़ बनविण्यास मदत करते.

  • संस्थापक : श्री. विनय तुकाराम बारहाते
    मोबा.: ९४२२१०११४७
  • समुपदेशिका.:-
    • सौ. संध्या मेश्राम
    मोबा.: ९८९०४२४५४७
    विधितज्ज्ञ अधिकारी
    श्रीमती देविशा दहिकर
    मोबा.:९३०९७४२३१५