स्वातंत्र्यदिनी जेष्ठ समाजसेविका डॉ. रेखा विनय बारहाते यांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान




स्वातंत्र्यदिनी जेष्ठ समाजसेविका डॉ. रेखा विनय बारहाते यांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार श्री.देवेन्द्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे, महिला व बालविकास क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. अशा महिला समाज सेविकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो, महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागपूर विभागातून सन २०१५-१६ वर्षाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार बापूजी बहुजन समाज कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव, डॉ. रेखा विनय बारहाते यांना जाहीर करण्यात आला होता, त्याच अनुषंगाने स्वातंत्र्याचेअमृत महोत्सवी वर्ष व स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातर्फे दि.१५ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण समारंभ मा. विभागीय आयुक्त कार्यालयाचे प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.
महिलांच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा हा नामांकित पुरस्कार असुन श्री. देवेन्द्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी जेष्ठ समाजसेविका डॉ. रेखा विनय बारहाते यांना सन २०१५-१६ वर्षाचा जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले आहे, यावेळी विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, श्री. विनय बारहाते, संस्थेचे व इतर सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.